ओंजळ

चांदणी ओंजळीत आली आणि

मला आकाश झाल्यासारखं वाटलं...

वाटलं की

इथून तिथेपर्यंत मीच व्यापून आहे... 

मीच भरून येणार

मीच रिती होणार

अंगभर रुळणा-या

चांदणीचं कौतुक करायला

वेळ पुरायचा नाही

माझं आकाश होणं

दिवसभर सरायचं नाही..

पण 
शेवटी आकाशच ते! 
लांबून लांबून दिसणारं
असल्यासारखं भासणारं
खरं तर
आपली ओंजळ नि त्याची पोकळी, 
सारखीच...!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments