उठल्यावर पेपर घेऊन बसलेला दिसलास तरी
नाकावर ओघळून आलेल्या चष्म्यातून
तुला सगळं दिसत असतं..
सगळीकडे लक्ष ठेवून असतोस
कुणाच्या सवयी कशा,
कोण चुकतंय, कोण बरोबर
सगळं कळत असतं...
घरात संपलेल्या वस्तूंची यादी
न सांगता तुझ्या मनात नोंदलेली असते
संध्याकाळी रिकाम्या हाताने आलेला
तुला कोणीच पाहिलेला नसतो...
घराचं मन तुडुंब भरताना
कधी मध्ये तुझ्या महत्वाकांक्षांना उंच
भरारण्याची लहर आलीच तर
घामासारखी निपटून टाकतोस..
नाकावर ओघळून आलेल्या चष्म्यातून
तुला सगळं दिसत असतं..
सगळीकडे लक्ष ठेवून असतोस
कुणाच्या सवयी कशा,
कोण चुकतंय, कोण बरोबर
सगळं कळत असतं...
घरात संपलेल्या वस्तूंची यादी
न सांगता तुझ्या मनात नोंदलेली असते
संध्याकाळी रिकाम्या हाताने आलेला
तुला कोणीच पाहिलेला नसतो...
घराचं मन तुडुंब भरताना
कधी मध्ये तुझ्या महत्वाकांक्षांना उंच
भरारण्याची लहर आलीच तर
घामासारखी निपटून टाकतोस..
घरातल्या प्रत्येकाचा कल्पवृक्ष
होता होता तू
उन्हात उभा आहेस
याची जाणीव कुणाला नसते...
उलट
आधी घर, मग आपण
ह्या समीकरणाची तुलाच
सवय लागलेली असते...!
ह्या समीकरणाची तुलाच
सवय लागलेली असते...!
हे सगळं करूनही
विशेष काही करत नाही
विशेष काही करत नाही
हा भाव घेऊन जे जगतोस
ते तुला जन्मतःच मिळालंय, की
जगता जगता तू ते आत्मसात केलंयस
याचं उत्तर शोधतेय मी....
-बागेश्री
ते तुला जन्मतःच मिळालंय, की
जगता जगता तू ते आत्मसात केलंयस
याचं उत्तर शोधतेय मी....
-बागेश्री
0 Comments