नभांगण...!!

सुरावटींनी सजलेल्या, तर कधी
उधळल्या गेलेल्या मैफिली....
घमघमलेली सांजरात अन्
अर्धोन्मिलीत मोगरा....

'आठवतंय का ते?'-
सालांनंतरच्या भेटीतला,
तुझा निरागस प्रश्न
तेच, विस्मयी डोळे न्
दुमडलेले ओठ!

तुला विचारायचेच राहून गेले
कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...?

तू नेहमीच काठाशी वावरणारी.....

'अपनी धुन में मस्त'
असं अधोरेखित जगणारी...
जितकं तुला ओढू पाहिलं,
अडकवु पाहिलं,
तितकी निसटत गेलेली...
'बांधील प्रेमाचा व्यापार का?'
ह्याच भोवती धुमसणारी

समजलो नव्हतो,
बंधनात अडकणारी तू नाहीस,
जितकं स्वातंत्र्य नात्यात,
तितकी माझी होशील ते!

उमजताच, आलो हाक मारायला

तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस....

हाका पोकळीतच विरल्या....!!

Post a Comment

1 Comments

  1. khup khup sunder!!!

    bai'ch man kalane khupach kathin...sagalyanch asach hot asel thode bahut..

    ReplyDelete