Saturday, 8 December 2012

माझं जिंकणं??

आज दान मागायला
तू दारी आलास....प्रेमाचं!

अगदी काल- परवा,
जी असहाय्यता मी चेहर्‍यावरून
उपटून टाकून दिली,
तीच पांघरून...

खाड्कन दार आपटून
उभी होते पाठमोरी,
दार बंद झाल्याचा आवाज
आतूनही आला... मनाच्या गर्भातून
घुमत....

तू बाहेर असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....

मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
कडी उघडण्याची,
बेदरकारपणे चेचलं 'तिला'.....

आज मी जिंकले होते...
पण;
गळणार्‍या आसवांचं कारण मात्र

अनाकलनीयच!

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...