उलगडा..

मन पाखरू झालं,
नि हवेवर बेभान तरंगत राहिलं, की
कोण आनंद होतो....!

त्याला वरनं बरंच काही 'वेगळं'
दिसू लागतं...

जमिनीवरुन 'उंच' भासणार्‍या 'व्यक्ती'
तिकडनं फार 'बुटक्या' वाटतात!

आपल्या नजरा विस्तृत होतात, की
जमिनीवरच्यांचे 'विचार' आकसतात?
हे कोडं आहे...

मात्र;
पहावं कधी-कधी, प्रत्येकालाच
अशा विशाल नजरेने...
चुकणारेही बरोबर आहेत वाटू लागतं...

किंवा;
चुक-बरोबर,
योग्य-अयोग्य,
खरे-खोटे...
ह्या गोष्टीच क्षणभंगूर असल्याचा
'उलगडा' होतो....!!

Post a Comment

0 Comments