पहिलं पाऊल

खूपशा तयारीनं पहिलं पाऊल उचलावं लागतं!
दुसर्या पावलाला
एक वचन द्यावं लागतं,
सतत चालत राहण्याचं
कायम सोबत करण्याचं,
पडलंच कधी अंतर तर नकळत मिटवून घेण्याचं!

उचललेल्या पावलाने करू नये विचार..
अडथळयांचा,
आडवाटेचा
हरण्याचा वा जिंकण्याचा
मनाला मार्गांशी जुळवून घेत जावं
खूपशा तयारीनं पहिलं पाऊल उचलावं...

करावा स्वतःचा कडा
अन् स्वतःलाच दयावं झोकून,
काय गवसेल,
काय हरवेल
ह्याची पर्वा न करता, बेफिकीर होत जावं
उचललेल्या पावलानं व्रतबद्धच रहावं....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments