Monday, 26 January 2015

पारा

तुझ्यासमोर येऊन उभं राहिल्यानंतर,
तुझ्या देहाचा आरसा होताना मी बघायचे अनेकदा..
सगळं जगणं एकीकडे आणि त्या आरश्यात घडणारं आत्मरूप दर्शन एकीकडे..

तुझ्यातला पारा आताशा निसटू पाहतोय!
जीर्ण देहाला ओलांडू पाहतोय...
मला एकटक निरखत नाहीस हल्ली
माझी मला ओळख दाखवत नाहीस हल्ली!!

निसटत चाललं आहे, जे हवंहवसं होतं
गवसत गेेलं आहे, जे कधी पाहिलं होतं!

तूही जाशील ना निघून, काळाने साद घातल्यावर
मलाही होता येईल ना आरसा, तुझा पारा चढ़वल्यावर?

-बागेश्री

No comments:

Post a Comment