Sunday, 1 March 2015

चौकोन

प्रेमाचा चौकोन रिकामा झाल्यानंतर,
तडजोडीने वाकलेले कोपरे दिसतात!

त्याची यथास्थित डागडूजी घ्यावी करून आणि
ठोकून टाकावा अंगणात...
सारवावा जरा गेरूने.

मनाच्या प्रवेशद्वारावर
सुलक्षणाची रांगोळी
काढायला बरा पडतो.

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...