Thursday, 16 July 2015

निरोप

मनावरच्या ओ़़झ्याचं गाठोडं डोळ्यामागे सहज बसतं.
तिथे एक छुपा कप्पा तयार झालाय.
हसणं, वेळ मारून नेण्याइतपत मॅच्युर्ड झालंय.
श्वासांची लय पण काँस्टंट असते.
आवाजातले चढ उतार हुकूमावर चालतात.
हातवारे शरीराचा आवाका जाणून आहेत.
मेंदूचा मनाशी जुजबी संबंध उरला आहे.
माझ्या भावनांवरचा दोघांचाही हक्क मी डावलला आहे.
सगळं काही वेल सॉर्टेड दिसतंय.

निरोप घ्यायला हरकत नाही.

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...