जगणं उत्फुल्लपणे सगळया बाजून बहरत असताना, जगण्याचा कैफ चढणारच!
अशातच खळखळून टाळी देण्यासाठी हात उंचवावा आणि त्याला जोड मिळावी तित़क्याच उत्स्फुर्तपणे टाळी झेलणार्या हाताची.
न अपेक्षा
न मागण्या...
न सुखाची व्याख्या न दु:खाची!
जे आहे, जसं आहे
ते आहे, तसंच आहे...
एवढं नजरेतून जाणणारी, आपली आपल्याला पटवून देणारी.. एक ओळख!
स्वत:ला स्वत:ची झालेली हीच ओळख वापरावी, दिशादर्शक म्हणून!
आणि उचलावं पाऊल ध्येयाच्या दिशेने, बेधडक!
पावलामागून पावलं पडतील... पडत राहतील.
एक कैफ अशी नवी दिशा देवून लोपेल.
तसं आणखी हवं तरी काय असतं?
-बागेश्री
0 Comments