तुझे दूर असणे जमेना जमेना 
तुला मी विसरणे जमेना जमेना 

तुला साद घालू कि घालू नको मी 
द्विधेतून सुटणे जमेना जमेना 

मनाशी तनाशी अशी जोडलेली 
तुझ्यावीण जगणे जमेना जमेना 

असे रंगले पान को-या वहीचे 
तिला ना मिरवणे जमेना जमेना 

दिसू लागते मग जणू रिक्त जागा  
तुला मी वगळणे जमेना जमेना  

कसा मी तुझा सांग उल्लेख टाळू
मला मी लपवणे जमेना जमेना

-बागेश्री