काल रात्री 'अलिबाबा आणि चाळिशीतले चोर' हा नाट्यप्रयोग पाहिला. ठाणे, गडकरी येथे.
एका लहानग्या विषयाला योग्य ट्रीटमेंट आणि ताकदीचे कलाकार, त्यांच्यातले give & take अतिशय टाईमली असेल तर नाटक किती रंजक होऊ शकतं ह्याचा उत्तम नमूना म्हणजे हे नाटक!
एका लहानग्या विषयाला योग्य ट्रीटमेंट आणि ताकदीचे कलाकार, त्यांच्यातले give & take अतिशय टाईमली असेल तर नाटक किती रंजक होऊ शकतं ह्याचा उत्तम नमूना म्हणजे हे नाटक!
प्रत्येकाचाच रोल अतिशय सुरेख वठवला गेला आहे.
आनंद इंगळे केवळ चेह-याच्या हावभावावरून स्टेज जिकतो, त्याचं टायमिंग कायम दाद मिळवून जातं कालही तेच झालं, प्रेक्षकवर्ग खळाळून हसला. स्पेशली "बटाट्याची भाजी काही आपण एरव्ही नाही करत का? आजच काय ते बटाटा, बटाटा" साधी ओळ, पण त्याची प्रसंग खुलवत नेण्याची हातोटी नक्कीच जबरदस्त आहे. तो नाटकभर फोनवरचे संवाद बोलतो, पण त्यातली सहजता कमालीची आहे, काल तो नाटक संपल्यानंतर म्हणाला, की हा प्रयोग तब्बल २ महिन्याच्या गॅपनंतर केला आहे, तेव्हा, खरंच ह्याचं कौतुक वाटलं की भुमिका एकदा अंगात भिनली की त्यावर विस्मरणाची पुटं चढत नाहीतच, हे खरे कलाकार.
त्यानंतर लक्षात राहून जाणारी कुणी असेल तर सीमा देशमुख. नाटकातलं 'शलाका' नावाचं पात्र. एकाच वेळी भाबडं आणि समंजस पात्र कसं कुणी इतकं निखालस रंगवू शकतं ह्या प्रश्नाला घेऊनच मी घरी परतले, ती कधी पुन्हा भेटलीच तर तिला मनःपूर्वक दाद द्यायची आहे.
विद्याधर बुवांबद्दल काय बोलावे? संवादफेक आणि अभिनय अतिशय सहज करणारा कलाकार. कुठल्याही भुमिकेत सहजता आली, की ती भुमिका थेट प्रेक्षकांत येऊन बसते. प्रत्येकाला आपली वाटते, असाच रंगवला आहे त्यांनी सॉफ्ट्वेअर मधला एक धमाल किडा.
राजन भिसे सुद्धा त्यांच्या सहज अदाकारीमुळे लक्षात राहून जातात.
नरेंद्र भिडे ह्यांचं नाटकाच्या इंटेन्सिटीला पुरक संगीत, रंगत वाढवतं..
विवेक बेळेजींची ही स्क्रीप्ट आहे, शेवटी हे नाटक प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावतं, हेच त्या लिखाणाचं मोठं श्रेय. सद्यपरिस्थीतीशी सांगड घालणारं असल्याने, नाटकातलं कुठलं न कुठलं पात्र नक्कीच फार जवळचं किंवा आपल्या आसपास पाहण्यातलं तरी वाटतंच.
ह्या नाटकाने कुठलीही मर्यादा न ओलांडता लग्न आणि लग्नाबाहेरची इन्टेन्स मैत्री फार संवेदनशील प्रकारे हाताळली आहे, इतकं नक्की म्हणेन.
मित्रांनो, संधी आल्यास नक्की पहा, तुम्ही निराश न होण्याची सारी जबाबदारी ही संपूर्ण टीम उत्तम प्रकारे पार पाडते, निर्वीवाद..
-बागेश्री
1 Comments
हे नाटक मी दोन वेळा पहिले. मजा आली . आनंद इंगळे … timing भन्नाट!
ReplyDelete