.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिचा पेहराव, ठेवणीतलं वस्त्र, त्याची झळाळी काही और होती. तिच्या प्रत्येक पावलानिशी तलम वस्त्रांची सळसळ ऐकू येत होती. दालनातला दास किमान एकदा तरी तिचा आजचा नूर, तिची लगबग थांबून न्याहाळत होता. त्याच्या त्या थांबण्यावर एखादा शेरा देत, पुन्हा त्यांना कामावर रुजू करण्याचं काम चित्रा चोखपणे करत होती. साक्षात इंद्र देवाने आजच्या सजावटीची ही खास जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जागच्या जागी आणि सुबकतेने सजवली गेली आहे की नाही, ह्याकडे चित्राचे कटाक्षाने लक्ष होते. गुलाब- केवड्याचा घमघमाट उठला होता. तलम- उंची रेशमाचे पडदे दालनाच्या प्रत्येक द्वारावर सोडण्यात आले होते. चित्रेच्या हातातील सुवर्ण तबकात चंदनाचा धूप जळत होता. प्रत्येक दालतानातून ती पुढे सरकताना, मागे रेंगाळणारा मंद दरवळ चित्त प्रसन्न करत होता.
मुख्य प्रवेशद्वारापासून नृत्यसभेपर्यंतचा मार्ग अनेक दिव्यांच्या रोषणाईत लखलखून उठला होता. पायाखालचा लाल गालिचा दिव्यांच्या प्रकाशात राजेशाही दिसू लागला. इर्दगिर्द टपोर फुलांचे ताटवे रचले होते. त्यांच्या टवटवीतपणावर नजर ठरत नव्हती. त्याच मार्गावरून डौलात चालत चित्रा नृत्यसभेच्या मधोमध पोहोचली आणि क्षणभर थबकली. तिने जशी सांगितली होती अगदी तशी बैठक उठली होती. सालंकृत, देखणी! नृत्य मंचाच्या छतावर मधोमध लक्ष दिव्यांचं झुंबर डोलत होते. नृत्य सुरु झाल्यानंतर दालन बंद करण्यासाठी खास लाल रंगाचे पडदे रेशमाच्या दोरीने दोन्ही बाजूने अलगद बांधलेले होते. राणीवशासाठी चिकाचा पडदा सोडण्यात आला होता. खुद्द इंद्रराजाची बैठक उंचावर आणि सुवर्णाने मढवलेली होती. त्यांच्या उजव्या बाजूला, जरासे खाली आकाराने लहान असे एक सिंहासन मांडण्यात आले होते. नृत्य मंचाच्या सभोवताली लोड- तक्क्यांची बैठक रचली होती. त्यावरील स्वच्छ व गंधित अभ्रे दरबाराची शोभा वाढवीत होते. बैठकीसमोर उंची मदिरा, मोगर्यांच्या माळा, गुलाब पाकळ्या, विड्याचे तबक, सजवून ठेवले होते. थोड्याच वेळात इंद्रपूरीतले एक-एक निमंत्रीत रसिक आजच्या नृत्याची पेशकश पाहण्यास उत्सुकतेने प्रवेशणार होते... हातातल्या चंदनी धूपाचं तबक एका बैठकीजवळ ठेवून, स्वतःलाच उत्तम सजावटीची पावती देत चित्रा मागे वळली.
इंद्रपूरीतला इंद्रमहाल तंतोतंत मनासारखा सजलेला पाहून चित्रलेखेने समाधानाचा नि:श्वास टाकला आणि आल्यापावली आपल्या मालकिणीच्या महालाकडे निघाली. तिची ही मालकीण म्हणजे तिचा जीव की प्राण. तिचे सर्वस्व! ह्या इंद्रपूरीतील निखालस स्वर्गीय सौंदर्य, साक्षात उर्वशी! उर्वशीची ही खास दासी तिची सखी सुद्धा होती, तिची केश रचनाकार होती, प्रसंगी उर्वशीची थट्टादेखील करण्याचा मान चित्रेच्या एकनिष्ठेने मिळावला होता. आजच्या नृत्यदरबाराच्या सजावटीचे इत्यंभूत वर्णन उर्वशीजवळ कसे करावे ह्यासाठी शब्दांची जुळवाजूळव करत चित्रेने चालण्याचा वेग वाढवला.
झपाझप चालत असता तिच्या डोळ्यासमोर, गेले कित्येक दिवस अथकपणे आजच्या नृत्य- नाटिकेचा सराव करणा-या उर्वशीच्या अनेक नृत्यमुद्रा तरळल्या. इंद्रराजाचे गौरव करणारे हे एक नृत्य नाटक. गेले अनेक महिने ही नृत्य नाटिका बसवून घेतली जात होती ती खुद्द नाटिकेचे रचनाकार भरत मूनी यांच्याकडून. सराव करत असताना झालेली सूक्ष्म चूकही त्यांना चालत नसे. केवळ एका चूकेखातर त्यांनी संपूर्ण सरावाची अनेकानेक वेळा पुनरावृत्ती घडवली होती. चित्रलेखेची नाजूक उर्वशी त्या सायासाने थकून गळून जात. पण इंद्रगौरवाचे ते नाटक अनेक निमंत्रितांच्या देखत सादर करायचे म्हणजे अगदी अचूक सुंदर व्हायलाच हवे, हा उग्र भरत मुनींचा अट्टहास...
शेवटी, आज तो दिवस उजाडला होता. इंद्रगौरव सांगणारी नाटिका, आपल्या नृत्य विलोभनातून स्वर्गातील लाडकी अप्सरा म्हणजेच उर्वशी साकारणार होती..उभी इंद्रसभा आपल्या पदन्यासावर पार खिळवून टाकणार होती...
चित्रलेखा उत्साहाने उर्वशीच्या महालात आली, किती आणि काय सांगावे ह्या आविर्भावात, आपल्याच नादात काहीबाही बडबडत ती उर्वशीजवळ आली. नृत्यांगनेचा पोशाख करुन एखाद्या कोरीव पुतळ्याप्रमाणे आपला विस्तृत केशसंभार मोकळा सोडून उर्वशी भल्या मोठा आईन्यासमोर उभी होती. तिच्या विचारांची तंद्री लागली होती. तंद्रीतच आपल्या रेशमी केसातून बोटे फिरवत ती उभी होती. चित्रलेखेने तिला बसते केले. तिच्या लांबसडक केसांना आपल्या हाती घेत तिची केशरचना करू लागली. तोंडाने अखंडपणे आज इंद्रदरबार कसा सजवला आहे, तिने जातीने कुठल्या गोष्टी करून घेतल्या ह्यापासून ते आजच्या उर्वशीच्या रुपावर भले- भले राजे कसे भाळतील इथपर्यंत बोलत राहिली...
उर्वशीचं मन मात्र ह्या झगमगाटात कुठेच नव्हते. तिच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतला होता इहलोकातल्या शूर, राजबिंड्या पुरूरवा राजाने! ती शरीराने स्वर्गलोकात असली तरी, मनाने पूर्णतः पृथ्वीवरल्या गंधमदन उद्यानात तिच्यासाठी झुरणार्या पुरूकडे होती.
सततच्या नृत्य नाटिकेच्या सरावाला कंटाळून काही दिवसांपूर्वी जेव्हा उर्वशी, चित्रलेखेला हाताशी घेऊन पृथ्वीलोकाची सैर करण्यास निघाली होती, तेव्हा तिच्या असीम सौंदर्याची भूरळ पडून एका असूराने तिला उचलून स्वतःच्या रथात घातली. तिचा हृदय पिळवटणारा आक्रोश आणि चित्रलेखेची मदतीची हाक नेमकी पुरूच्या कानी आली.
घटिकाभराच्या असूर लढाईनतंर उर्वशीच्या रुप- स्पर्शाने मोहरलेला पुरू, स्वतःला सावरण्याआधीच उर्वशीचा निरोप घेऊन बसला होता. त्यानंतरचे अनेक दिवस त्याचे चित्त राज्यकारभार आणि संसार ह्यातून संपूर्ण उडाले होते. रात्रंदिन उर्वशीचा ध्यास घेतलेल्या त्याच्या मनाला, काही रूचत नव्हते. अन्न- पाण्याची भ्रांत राहिली नव्हती.
त्याला ह्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी, त्याचे मन रमवण्यासाठी पुरुच्या राणीचे अथक प्रयत्न सुरु होते. त्याचाच भाग म्हणून आज पृथ्वीरील गंधमदन उद्यानात, पुरुच्या रंगमहालात, नृत्याविष्कार आणि मदिरापानाची सोय करण्यात आली होती. पुरू त्या महालात बसला खरा, पण न त्याला मदिरा हाती घ्यावी वाटली न त्याने नृत्य सुरु करण्याची खूण केली. तो उर्वशीच्या कैफात कुठेतरी नजर हरवून बसला होता.
चित्रलेखेने उर्वशीची केशरचना संपवून, एकदा तिला न्याहळले. तिच्या रेखीव शरीरावर विराजमान झालेला प्रत्येक अलंकार किती नशीबवान असे तिला वाटले. पुढे होत तिने हाताची दहाही बोटे उर्वशीवरून उतरवून स्वतःच्या कानशीलावर कडाकड मोडली. कशातच लक्ष नसलेली उर्वशी यंत्रवत नृत्यमंडपाकडे निघाली. सारा दरबार अगदी इंद्रासकट अप्सरेच्या दर्शनासाठी आसूसला होता. ती आत येताच, तिच्या सौंदर्याला पाहून अनेक उसासे मंडपभर ऐकू आले. अनेक नजरांनी तिच्या नजरा उतरवल्या आणि इंद्रराजाने नृत्य नाटिका सुरू करण्याची खूण केली. इंद्राच्या उजव्या बाजूकडील सिंहासनात भरत मूनी विराजमान झाले होते. नाटिका अचूक वठणार, ह्याची त्यांना मनोमन खात्री होती. नाटिकेचा पहिला प्रवेश उर्वशीने घेतला आणि मूनींसकट सारे तिच्या हावभावांमधे हरवत चालले..... नाटक रंगत चाललं, नृत्याविष्कार साकारात चालला. मैफिलीत मद्याचा रंग हळू हळू मिसळत असतानाच, पुरूच्या आठवणींनी व्याकूळ उर्वशी, एके ठिकाणी, इंद्राचा उल्लेख "पुरुषोत्तम" असा करण्याऐवजी, "पुरूरवा" म्हणून करून बसली आणि भरत मूनी सिंहासनावरून ताडकन उठून उभे राहिले....!!
इंद्राची ती नृत्यसभा जागच्या जागी स्तब्ध झाली. मैफिलीचा रंग खाडकन उतरला आणि गडगडाटी शापवाणी मूनींच्या तोंडून बाहेर पडली "हे उर्वशी, तू माझ्या नाटकात रमली नाहीस, तू स्वर्गलोकीचं भूषण असूनही, ज्या पुरूषाचा उल्लेख करून गेलीस, त्याच पुरूषाबरोबर तुला संसार करावा लागेल. पृथ्वीलोक स्वीकारावा लागेल. जा उर्वशे, ह्याच क्षणी तुला स्वर्गलोक पारखा झाला आहे" सारा इंद्रमहाल उभ्याजागी हळहळला.
पुरूरव्याने हाताने खूण करताच, पृथ्वीलोकातील रंगमहाली नृत्यांगणा अवतरली. तिच्या स्वर्गीय सौंदर्याने पुरूचा महाल अवाक होऊन उभा राहिला. सगळी गजबज क्षणभरात शांत झाली. उर्वशी नृत्याची परवानगी मागत खालमानेने उभी होती. पुरुरव्याने अत्यानंदाने खूण करताच, राजस पावले वाजली, उर्वशीचे दैवी बोल उमटले....
"कोमलकाया की मोहमाया
पुनवचांदणं न्हाली
सोन्यात सजली, रूप्यात भिजली
रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली, जशी उमटली
चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली, पाहून थिजली
इंद्रसभा भवताली"
त्या स्तब्ध इंद्रसभेला, स्वर्गलोकाला त्यागूनच आज ही वीज पुरुच्या रंगमहालात अवतरली होती. एक शाप तिच्यासाठी जणू आशीर्वाद ठरला होता. ती अत्यानंदाने पदन्यास घेत असता, पुरुच्या आश्रयातल्या गायकांनी सूर उचलले....
"अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली
पसरली लाली, रत्नप्रभा तनू ल्याली.....
अप्सरा आली.... इंद्रपुरीतून खाली"
स्वतःभोवती गिरक्या घेत उर्वशी आत्ममग्न होत नाचत राहिली
पुरुने खुणेनेच इतरांना रंगमहाल रिकामा करायला सांगितला, पुरुच्या महाराणीने स्वत:हून तिथून जाणे पसंत केले.
मनविभोर स्वतःत मग्न अप्सरा, पुरुसाठी स्वर्ग त्यागलेली अप्सरा आणि तिचा पुरु हेच काय ते महालात उरले. तिच्या रूपाचं कौतुक करत पुरुही गाता झाला..
"छबीदार सूरत देखणी, जणू हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार...."
जरासं भानावर येत, महालात त्या दोघांशिवाय कुणीही नाही, हे कळताच, उर्वशी आणखी मोकळी होत, गात राहिली, तिची नाजूक पाऊलं थिरकत राहिली....
"ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली"
पुरु तिला साथ देत सुरात सूर मिसळू लागला...
"अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली" स्वतःलाच जणू वारंवार ही आनंदाची बातमी सुनावू लागला!
रात्री उशीरापर्यंत रंगमहालातून सूर उमटत राहिले
-बागेश्री
-----------------------------------****------------------------------
ह्या ललितलेखाबद्दल मनातलं काही:
मला भेटलेली गाणी: अप्सरा आली
स्वर्गातली सुखलोलूप अप्सरा. का यावी बरं स्वर्गसूख त्यागून, अशाश्वत मानवी जगात, पृथ्वीवर? काहीतरी खूप सकस कारण द्यावं ह्या गीताला जेणेकरून अप्सरेचं इथे उतरणं जणू अत्यावश्यक वाटू लागेल, असा विचार आला आणि कधीतरी कानोपकानी ऐकलेली उर्वशी-पुरूरव्याची पौराणिक कथा नकळत आठवली.
त्याचा फुलवरा केला, इंद्रमहाल सजवला, चित्रलेखेचं व्यक्तीचित्रण केलं. रचनाकार भरत मूनींचं कडवं रूप उभं केलं आणि त्यांच्याच शापवाणीचा वापर करत, अप्सरेचा पृथ्वीलोकावरला अटळ प्रवेश साकारला.
"अप्सरा आली, इंद्रपूरीतून खाली" हे गाणं मला असं भेटतं नेहमी. शापित अप्सरेने आपल्या प्रेमासाठी इहलोकात साकारलेला हा प्रवेश गुरु ठाकुरच्या शब्दांनी असा पकडला असावा, असं वाटत राहतं. कल्पनेची भरारी, दुसरं काय?

वेळोवेळी अनेक युद्धात ज्याने इंद्राला मदत केली होती, असा धाडसी पुरु, जीवाची पर्वाही न करता त्या असूराशी भिडला आणि त्याला कंठस्नान घातले...
ह्या झटापटीत त्याचा नकळत झालेला स्पर्श आताही उर्वशीच्या अंगावर रोमांच फुलवत होता. पृथ्वीवरच्या मानवाचा पहिला स्पर्श. स्त्री लज्जारक्षणार्थ स्वत:चा जीव धोक्यात घालणारा वीर पुरूष. ज्याला हे ठाऊकही नव्हते, की जिच्या जीवाचे रक्षण केले ती प्रत्यक्ष इंद्रनगरीची अप्सरा आहे. अशा वीरावर लुब्ध होऊन उभी उर्वशी आणि तिचं ते रूप पाहून संमोहित झालेला पुरू. अशी त्यांची पहिली भेट.
झाल्या प्रकारानंतर चित्रलेखा उर्वशीला पुन्हा स्वर्गलोकी घेऊन आली खरी, पण तिलाही हे कळून चुकले होते, तिची उर्वशी काही पूर्णतः स्वर्गलोकी परतली नव्हती. मनाने ती पुरुची झाली होती. आजवर ज्या उर्वशीला इंद्रपुरीने केवळ एका स्त्री-मित्र रूपात पाहिले होते, माता किंवा पत्नी रूपात उर्वशीने आपले सर्वस्व कुणालाही दिलेले नव्हते, तीच उर्वशी इहलोकीतल्या एका पुरूषावर पूर्णतः भाळली होती. मनाने त्याला वरुन बसली होती.

5 Comments
अफलातून.............. बागेश्री, तुझं कवी मनच अशी कल्पनेची भरारी मारू शकतं. त्यात तू एका कथेचा आधार घेऊन त्याला कल्पनेची जी जोड दिली आहेस ती केवळ अप्रतिम. तुझ्या सौंदर्य दृष्टीचं कौतुक करताना हे पण नमूद करायला हवं की जे डीटेल्स तू लिहिले आहेस त्यातून अक्षरशः त्या महालात फिरून आल्यासारखं वाटलं मला. एखाद्या इंटिरियर डेकोरेटर लाजेल असा तु तो महाल सजवलास.
ReplyDeleteमला खात्री आहे की गुरु ठाकूर यांनी हे लिखाण वाचलं तर ते दाद दिल्याशिवाय रहाणार नाहीत.
नेहमी नाही पण खूप वेळा कविता, गाणी ही modern art सारखी असतात. प्रत्येकाची नजर त्यात एक वेगळा अर्थ पाहु शकते. ते अर्थ समजून घेणं ही जशी त्या artist साठी एक प्रत्ययकारी गोष्ट असू शकते तशीच ती कवी / गीतकार यानाही आवडत असेल असं मी समजतो. तु स्वतः हा अनुभव नक्कीच घेतला असशील. तरीही एक सांगतो की गुरु ठाकूर याचं मात्र या गाण्याच्या निर्मितीच्या या प्रोसेस बद्दल दुमत असणार नाही. हवं तर विचारून पहा. तुझी ओळख आहेच. नाही का?
अजून एक. पद्म लिहिता लिहिता तु गद्य पण खूप छान लिहिते आहेस. चालूच ठेव. मी भविष्यातली एक प्रतिभावान लेखिका पहातोय. अगदी नजीकच भविष्य ......
Thank you so much Sunil ji, for all wonderful compliments!
ReplyDeleteYes I have shared it with Mr Guru Thakur, and he too liked the thought. Thanks again. His words are much more powerful than this story anyways.
आज वाचला तुझा रिप्लाय. ग्रेट.
Deleteगुरु ठाकूर यांनीच मत दिल्यावर तुझ्या प्रतिभेला योग्य दाद मिळाली असं म्हटलं पाहिजे. Keep it up.
Apratim katha varnan ,prasang aani ho kavyahi.sampurn prasang dolya samor ubha karnyachi lekhnshaili,lajawab
ReplyDeleteThank you, Sangeeta ji
ReplyDelete