सोपान

व्यक्तिमत्व एका दिवसात फुलत नाही.
ती प्रकिया आहे.
असं म्हणू, तो एक सोपान आहे, चढत चढत कळसाशी नेणारा
तुम्ही आज जर विसाव्या पायरीवर असाल, तर खालच्या एकोणवीस पाय-यांचा विसर पडून चालणार नाही.
ह्या सोपानाला एक कठडा आहे, तुम्ही पडू नये म्हणून कायम आधार असणारा. पहिल्या ते शेवटच्या पायरीपर्यंत अखंड सोबत करणारा. त्याला देवाच्या जागी ठेवून पुजलंत तर तुमचं माणूसपण आणखी लख्ख होईल

Post a Comment

1 Comments

  1. माणूसपण, माणुसकी हे व्यक्तिमत्वाच केवळ पूजन नाहीयेय, ती संस्कृती आहे....सृजनशील माणसाची...जगाची पकड घेणा-या लिखाणाला मनाच्या अनुभवाची मोठ्ठी खोली असावी लागते...तिथूनच मग ज्ञानेश्वर,तुकाराम इ.व्यक्तिमत्वे आविष्कृत होतात. देव खरोखर आहे की नाही, मला माहित नाही. पण देवत्व मात्र माणुसकीच्या निर्मळ व्यक्तीमत्वात साकार होताना मी पाहतो, अन अशाच व्यक्तीमत्वांना मी देव, परमेश्वर मानतो. बागेश्री, ही मनाची खोली गाठण्याची तुझी घडपड खरंच प्रभावित करणारी आहे.त्यातूनच तुझे व्यक्तिमत्व फुलत आहे...हे पाहणं, बघत राहणं...हा एक रम्य अनुभव आहे....

    ReplyDelete