Thursday, 3 March 2016

प्रेमात पडल्यावर

दावणीला काय आहे
उरलंय काय शिल्लक
असं सगळं बघायचं नसतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...

आपल्याकडे लक्ष कुणाचं
बघतंय कोण एकटक
लोकांना दुर्लक्षानेच मारायचं असतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...

नजर हरवून शुन्यामधे
बसावं स्वतःशी हसत
नाती गोती, मित्र परिवार गेले सगळे उडत
आपण फक्त, फक्त स्वतःत रमायचं असतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...

येईलच ना जाग कधी
झापड जरा सारल्यावर
वाटेल चुकलो मुकलो
भानावरती आल्यावर
काहीही वाटलं तरी, स्वतःला 
दोषी काही ठरवायचं नसतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...