अनेक वर्षानंतर तुला भेटायला आले
आणि एखाद्या एलियनकडे पहावं
तशी तुझी 'एकटक नजर' बघता
मला एखाद्या अनोळखी ग्रहावर उतरल्यासारखं वाटलं
मी घाईने स्वतःचे हात, नाक, कान चाचपडून पाहिले
पण, मला मी माणूसच वाटले..
तू खुणेनेच बसायला सांगितलंस
नोकराला एक इशारा केलास
त्याने अगदी पाच मिनिटात पुढ्यात कॉफी आणून ठेवली
मी कॉफी संपवेपर्यंत तू "त्याच" नजरेने पहात राहिलास
मी घाईने स्वतःचे हात, नाक, कान चाचपडून पाहिले
.. मला मी नक्की माणूसच वाटले
कुठूनतरी काहीतरी विषय काढावा म्हणून
मी काही बोलणार इतक्यात
तू न आलेला फोन घेतलास
आणि "एक्स्क्यूज" असं म्हणत माझ्यावर 'तोच' कटाक्ष फेकलास
आता मात्र मला तुझे हात, नाक, कान चाचपडून पहावेसे वाटले
...तसा तू माणसासारखाच दिसत होतास
माझी कॉफी संपली होती
माझ्या हालचालीतली लगबग पाहून
काही काम होतं का 'तुमचं' असं विचारलंस
माझ्या घराच्या वास्तूचं निमंत्रण तुझ्या हातात ठेवलं
तेव्हा 'अजूनही माझंच आडनाव लावतेस'
म्हणत तू अचकट हसलास
आणि तुझ्या इगोचा जोडदात लक्ककन चमकला!
तू बदललाच नव्हतास
मी मात्र मी कायमच तुझ्या ग्रहावर एलियन होते
ही खात्री पटली....
-बागेश्री

2 Comments
absolutely fantastic..Bageshree...u r the master of this craft...hats off
ReplyDeleteHey, Thanks Yash....
ReplyDelete