Saturday, 30 April 2016

फक्त एकदाच

आयुष्यावर आयुष्याने
बेसुमार बरसताना,
रक्ताने उंच उसळावे..
फक्त एकदाच!

रंगांनी त्वचेत जिरताना,
भावना रंगीत होताना
अस्तर जगण्याला यावे
फक्त एकदाच....

कानाचे गीत होताना
सुरांनी आत जिरताना
गीत शरीराचे व्हावे
फक्त... एकदाच...

श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच!

क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच....!!

-बागेश्री

No comments:

Post a Comment