परतूच नये
काही ठिकाणावरून... पुन्हा
गेलातच परतून तर
कदाचित स्वागतही होईल
निघताना ओढून घेतलेला दरवाजा कदाचित
आजही किलकीला असेल
पण निकरानं उल्लंघन करणाऱ्या पावलांना चिकटलेली
मोहाची धूळ
उंबरठा गिळून घेत असतो
घराची लाज राखत!
त्याचा सन्मान करावा
परतूच नये
काही ठिकाणावरून... पुन्हा
-बागेश्री
 
 
 
 Posts
Posts
 
 
 
0 Comments