ती बोलत नाही काही
डोळ्यांनी सुचवत जाते
निःशब्द किनारा त्याचा
श्वासाने उसवत जाते
भारल्या निळ्या डोळ्यांच्या
काठाशी काजळमाया
ती मिटते पापण त्याच्या
अंतरात उतरत जाते
ती दिसते सावळ राधा
तो गोमट गोरा कान्हा
रंगात रूप दोघांचे
मग ऐसे मिसळत जाते
ती बोलत नाही काही
डोळ्यांनी सुचवत जाते..
-बागेश्री
 
 
 
 Posts
Posts
 
 
 
0 Comments