Friday, 14 April 2017

घे भरारी

भरार महत्वकांक्षेचे
पंख छाटून टाकले तेव्हा
पर्याय नसल्याने
ती खाली उतरली...
आणि
जमीनीवर आल्याने
तिच्या माझ्यात
संवाद घडू लागले...!
आजही,
आम्ही चहा पीत बसलोय
गप्पा छान रंगल्यात.
मी कौतुकानं तिला पाहतेय
मला काय हवं
हे ती जाणून घेऊ लागलीय..
नव्या पंखाना बाळसं धरतंय
पुरेसं बळ आलं
की भरारतीलच... पुन्हा
ह्यावेळची भरारी मात्र
पुरेपूर शहाणी असेल
समजून- उमजून मारलेली
स्वाभिमानी आणि
करारी असेल...

-बागेश्री

No comments:

Post a Comment