Tuesday, 4 April 2017

ऋतू

....खूप ऊन पडलं
करपून जायला झालं
मग ऋतू बदलला
हवा पालटली
गारवा पडू लागला
ढग जमू लागले
गाणं गाऊ लागले
मग चिंब भिजवणारा पाऊस आला
अंगा खांद्यावर
नाजूक नाजूक
हिरवी नक्षी चितारून गेला
बहरून मोहरून गेला
काही दिवस आनंदोत्सव
साजरा झाला
मग हळू हळू
तापू लागलं
खूप ऊन पडलं
करपून जायला झालं....

मला कळलंच नाही
ऊन का
मला कळलंच नाही
पाऊस तरी का

मीही झाड होऊन उभीच राहिले
तूही ऋतूंची मनमानी सोडली नाहीस

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...