मग काय होतं?
मग एक मोठ्ठा मोर्चा निघतो
त्यांच्या आपापसात काही मागण्या असतात म्हणे
त्याला ते मिळालं
मला नाही मिळालं
म्हणून ते रस्त्यावर येतात म्हणे
राजकारणाचा वास पसरवत
मोर्चा रस्त्यावर येतो आणि
आमच्यासारखे
कधीच
कुठल्याच मोर्च्यात सहभागी न झालेले
रस्त्यावर झालेल्या ट्रॅफिक जॅम मधून
वाट काढत
भाजी, दूधाची पिशवी घेत कसेबसे
घरी पोहोचतो..
आम्ही वर्षभर राबतो
कुठलाही टॅक्स चुकवत नाही
आमच्या मागण्या नसतात
आम्ही आवाज करीत नाही
आम्ही मूक होत नाही
की कधी मेणबत्तीही पेटवत नाही!
आम्ही निमूट मतदान करतो
दरवर्षी, न चुकता.
-बागेश्री
2 Comments
आम्ही मूक असतो, पण मनाने मात्र आमच्याच करीता आणि विरुद्ध मोर्चे सदैव काढलेले असतात!त्यांना सतत सामोरं जाताना मात्र सृजनशील स्फुट निर्माण होत असतं, ते हे असं!😊
ReplyDeleteThank you kaka
Delete