आपल्या मनाच्या परासदारी भुतकाळ आणि अंगणात भविष्यकाळ! आपण वर्तमानाच्या सडपातळ उंबरठ्यावर उभे राहून, सतत भविष्याचा तरी वेध घेऊ पाहतो नाहीतर फावल्या वेळात मागील अंगणात जाऊन वाळलेला पानं- फुलं तरी वेचत राहतो.
साहजिकच. निमुळत्या अर्ध्या फुटाच्या उंबरठ्यावर रमत नाही आपण. कारण तिथे फक्त पाय ठेवण्यापुरती जागा असते. रमायला ऐसपैस अंगणच लागतं.
भविष्याकडे मुख करून. भुतकाळाकडे पाठ करून. जोवर सर्व जाणिवा सजग ठेवत उंबरठ्यावर आपण ताठ उभे राहू शकत नाही, त्याक्षणाला निव्वळ उंबरठ्याचेच, उंबरठ्यापुरतेच होऊन जात नाही तोवर जगण्यातच आपला प्रवेश झाला नसल्याचे समजावे. तोपर्यंत घडून गेलेला भूत किंवा न घडलेल्या भविष्याची चिंता वाहणारे आपण निव्वळ एक जिवंत कलेवर आहोत.
-Bageshree

0 Comments