पुस्तक दिन

दिवसभराच्या धावपळीतनंतर
मी माझ्या वाट्याला येते, तेव्हाचा क्षण
पुरेपूर जागून घ्यावा वाटत असताना
पेंटींग करावं की काही लिहावं, आवडीची प्लेलिस्ट लावून मस्त गाणी ऐकावीत की नुसतंच निवांत बसावं, हे काही केल्या ठरत नाही. फ्रेश होऊन पा वलं मात्र नकळत पुस्तकाच्या कप्प्याकडे वळतात आणि कळतं मनाला विरंगुळा देणारी गोष्ट वाचनाशिवाय कुठलीच नाहीय...!!

अवती भोवती पुस्तके आहेत म्हणून मनाच्या आत पोकळी नाही ही भावना जेव्हा जेव्हा सुखावते तेव्हा पुस्तकांशी हात जोडले जातात.. मनातून धन्यवाद उमटतात!

पुस्तकदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..
येत्या वर्षांत तुम्ही अनेक पुस्तकापर्यंत पोहोचावे व त्या पुस्तकांनी तुम्हाला तुमच्या आतला प्रवास घडवावा ही सदिच्छा..
-बागेश्री

Post a Comment

0 Comments