इंद्रधनू

नात्यावर गैरसमजाचा
एखादा जरी ढग
रेंगाळू लागला तरी
अंधारून येतं!
अशावेळी
बरसू द्यावं
डोळ्यांमधलं 
दाटलेलं आभाळ...
धरणीनेही 
घ्यावं झेलून
मनामधलं 
साठलेलं आभाळ...

मळभ निघून गेल्यावर
नातं लकाकू लागल्यावर
डोळ्यांमध्ये येऊन बसतं
गालातल्या गाली हसतं
कोवळसं इंद्रधनू..!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments