Thursday, 24 March 2016

साकव

काही द-या सांधल्या जात असून सुद्धा सांधाव्या वाटत नाहीत. साकव टाकला की पलीकडून पुन्हा त्याच गोष्टींचा ओघ सुरु होणार असतो ज्याने कधीकाळी साकव आवरून घ्यायला भाग पाडलं होतं.

काही द-या राखूनच ठेवाव्यात. अलीकडचं पलीकडे दिसू द्यावं एकवेळ, पण साकव घालू नये.

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...