समर्पणाचं अगदी बोट धरून
अपेक्षा आल्याच... ठेचकाळत, हसत-रडत..!!
पण;
समर्पणाला आत घेऊन,
अपेक्षांना दाराबाहेरच ठेवण्याचा आदेश तुझा...!
उदास अपेक्षा हिरमुसल्या!
मीच मधे पडले मग...
अरे, मी तुला सगळं दिलंय...
सगळ्ळं!!
हो, मान्य,
पण मग अपेक्षा का आणल्यास बरोबर?
निस्वार्थीपणा कुठे आहे?
आजही आठवत नाही,
मी 'निरुत्तरीत' का झाले तेव्हा!
...कदाचित मी माणूसच आहे,
ह्याचाच तो 'पुरावा' होता...!!
-बागेश्री
अपेक्षा आल्याच... ठेचकाळत, हसत-रडत..!!
पण;
समर्पणाला आत घेऊन,
अपेक्षांना दाराबाहेरच ठेवण्याचा आदेश तुझा...!
उदास अपेक्षा हिरमुसल्या!
मीच मधे पडले मग...
अरे, मी तुला सगळं दिलंय...
सगळ्ळं!!
हो, मान्य,
पण मग अपेक्षा का आणल्यास बरोबर?
निस्वार्थीपणा कुठे आहे?
आजही आठवत नाही,
मी 'निरुत्तरीत' का झाले तेव्हा!
...कदाचित मी माणूसच आहे,
ह्याचाच तो 'पुरावा' होता...!!
-बागेश्री
 
 
 
 Posts
Posts
 
 
 
1 Comments
स्वार्थ आणि अपेक्षा ह्यांची सांगड तशी घालू नये ...
ReplyDeleteस्वार्थाला निदान कधी कधी अर्थ तरी असतो ...