Thursday, 21 June 2012

बंडखोरी...!

वावरणारा प्रत्येक मनुष्य,
एक ठिणगी!!
प्रत्येकात एक ज्वाला,
खोल आत दडलेली,
अवकाश निव्वळ ठिणगीने पेट घेण्याचा,
भडका ठरलेलाच!

अश्या लाखो ठिणग्या,
अवती-भवती वावरणार्‍या...
अचानक सगळ्यांनी पेटून उठावं
एकेच दिवशी, एकाच वेळी...!
मग,
ह्या पृथ्वीला, इतर ग्रहांना, आकाशगंगेला-
ह्या प्रचंड उर्जेचा भार पेलवेल??

आकाशाची पृथ्वीशी असलेली
क्षितीजावरची घट्ट वीण, उसवेल ताडकन!
आणि झेपावेल पृथ्वीच, आकाशगंगेबाहेर!

तिचा नवा सूर्य शोधण्याकरिता...!!


Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...