मी- कारण जगण्याचं?

शेवटी मीच
तुला 'माणसांत' आणायचं ठरवलं......
पलीकडे न्यायचं ठरवलं!

तर खळाळून हसत म्हणालास,
"माझी मदत मात्र जा विसरून...
वल्हव एकलीच..शुभेच्छा!"

'शिकस्त' शब्दाला लाज वाटेल असे प्रयत्न करीन!
तुझ्या मदतीशिवायच, तुझी नाव वल्हवेन!
माझाही निर्धार!!

पण,
मला कुठे ठाऊक होतं,
ह्या प्रयत्नांवर 'अपयशाचा' वरदहस्त आहे म्हणून?

अखेर
झालीच गाठ-भेट,
यत्नांची अपयशाशी,
मो़कळ्या, सुनसान क्षितिजावर!
जमलं नाहीच एकटीला,
हताश मनाने, निघाले, माझ्या मार्गी....
एकलीच!!!!

तर मागोमाग,
तुझ्या 'संपण्याची' खबर!!

भिरभिरलं जग सारं...
कसं हे?
माझे निष्फळ प्रयत्नच,
तुझ्या जगण्याचं कारण होतं??

Post a Comment

0 Comments