ही झाली संध्याकाळ 

ही झाली संध्याकाळ
दिवसाचे कलणे झाले,
अंबरी चांदणे येता
श्वासांना गहिवर आले..

गलबलून येते काही,
ना गाव न नाव तयाला
रुजलेली, मनि जपलेली
अव्यक्त भावनामाला..

ना डोळा रुचते काही
जरि पाते हिरवे हिरवे
पाऊस दाटलेला अन
ऋतु मुग्ध गुलाबी बरवे

टपटपले थेंब सभोती
ही धरती ओली ओली
गलबलुन भावडोहाने
गाठली आणखी खोली...

Post a Comment

0 Comments