Sunday, 5 January 2014

चौकट

काही क्षण नजर चोरून उभे राहतात- मान तुकवून...

तेव्हा फसवणूक कुणाची, कुणाकडून?
लाज वाटलेल्या क्षणांची, जीवनाकडून;
की
आपली, त्या क्षणांकडून....?

जगताना आपण तयार केलेल्या, बुर्‍याभल्याच्या चौकटी
आपल्यालाच आवळत जातात,
असे अवघड प्रश्न, मग
चौकट छेदूनच सोडवावे लागतात.....

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...