चौकट

काही क्षण नजर चोरून उभे राहतात- मान तुकवून...

तेव्हा फसवणूक कुणाची, कुणाकडून?
लाज वाटलेल्या क्षणांची, जीवनाकडून;
की
आपली, त्या क्षणांकडून....?

जगताना आपण तयार केलेल्या, बुर्‍याभल्याच्या चौकटी
आपल्यालाच आवळत जातात,
असे अवघड प्रश्न, मग
चौकट छेदूनच सोडवावे लागतात.....

-बागेश्री

Post a Comment

3 Comments

  1. खूपच छान लिहिले आहे.
    अर्थगर्भ,प्रवाही आणि तरलहि तितकेच.
    खरे आहे.
    काही अपराधी क्षण माफीच्या व्याकूळ अपेक्षेने मान वर करतातही....
    पण तेवढ्यापुरतेच !

    ReplyDelete
    Replies
    1. Tevadhyapurtech! Mag thik... sagalach KshaNabhangur!!!

      Delete
    2. होय. खरे आहे. सगळेच क्षणभंगुर.
      आणि हि समज देखील क्षणभंगुरच ठरते !!!
      का कुणास ठाऊक पण वेदनेची देखील अपेक्षा वाटू लागते…
      म्हणूनच जखम होणार हे माहीत असले तरी तो अनुभव
      पुन्हा पुन्हा घेत रहाते हे मन….

      Delete