एक ओरखडा त्याचा
एक तिचा...
पुन्हा एक त्याचा
आणखी एक.....

काच धूसर होत जाते

पलीकडे स्वप्न सावध होतं
वाकुल्या अस्पष्ट दिसू लागतात!

एकमेकांत समंजस खाणाखुणा असाव्यात
काच चकचकीत पारदर्शी राहते..

-बागेश्री