Tuesday, 22 September 2015

चौकट

तुला वाटलं,
शेवटचा घाव तसा साधारण होता
पण आधी अनेक घाव सोसून सारं काही मोडकळीस आलेलं होतं,
बाहेरच्या चौकटीमुळे आत कसंबसं तग धरून होतं.

शेवटच्या घावासरशी त्या चैतन्याने उडून जाणं पसंत केलंय!

हे असंच होतं, चैतन्याला कायम भक्कम वास्तव्य हवं.
काळजी करू नकोस.

त्या निर्जीव चौकटीची काय व्यवस्था लावायची ते बघ.

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...