पुन्हा सांग गीता

आपुलीच नाती। आपुलेच लोक।
दाताखाली ओठ। आपुलेच ।।
गाऱ्हाणे सांगावे । कुणापाशी आता ।
कर्ता करविता । एक झाला ।।
विरोधात उभे । सान थोर सारे ।
संग्रामाचे वारे। घर भेदी ।।
नात्याच्या संग्रामी। मनाचा अर्जून।
जाई कोमेजून। युगे युगे ।।
कृष्णा रे मुकुंदा । धाव तूच आता ।
पुन्हा सांग गीता। मार्गदर्शी।।
-बागेश्री देशमुख

Post a Comment

0 Comments