कधी ऐकू येतो,
निर्वात पोकळीतला शांततेचा आवाज.
जो शिरत जातो कानाच्या गर्भातून खोल खोल
कुठलाच प्रतिध्वनी मागे न ठेवता
आणि आत उमटवतो
लहरींची असंख्य आवर्तनं!
सुन्न मनाचे डोळे मिटतात
गात्र थिजतात
जन्माचा फेरा पळभर थांबतो
आपलाच हात आपल्या हातात देऊन
येतानाच्या दुप्पट वेगाने बाहेर पडतो
शांततेचा मग्न सूर!
एवढा एक क्षण पुरतो
जगणं एकवटून ऐकून घेण्यासाठी.
-बागेश्री
0 Comments